न्यायाधीशाच्या घरात सापडले कोट्यवधीचे घबाड   

कारवाईऐवजी नवी नियुक्ती!

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी कोट्यवधीचे घबाड सापडले आहे. यानंतर, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदांनी प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. यासोबतच, न्यायवृंदाने न्यायमूर्ती वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. न्यायमूर्ती वर्मा यांच्या सरकारी निवासस्थानाला मागील आठवड्यात आग लागली होती. यावेळी निवासस्थानात मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोकड सापडली होती.
 
या घटनेनंतर सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यांच्या न्यायवृंदानी तातडीने बैठक घेतली होती. तसेच, वर्मा यांच्या बदलीची शिफारस केली होती. मात्र, काही न्यायाधीशांनी चिंता व्यक्त केली होती.
 
तसेच, चौकशी किंवा महाभियोगाची मागणी केली होती. न्यायवृंदाने वर्मा यांच्या बदलीच्या शिफारशीसोबतच दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे घटनेचा प्राथमिक अहवाल मागवावा आहे. न्यायवृंदांची शिफारस केंद्राने मंजूर करताच बदलीची प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, वर्मा यांच्या निवासस्थानी नेमकी किती रोकड सापडली, याबाबतची आकडेवारी अद्याप स्पष्ट झालेली नाही.
 

Related Articles